10 July 2020

News Flash

मोटरमन, गार्डकडून मदत मिळाल्याने तरुणाचे प्राण वाचले

सायन रुग्णालयात तरुणावर त्वरित उपचार सुरू करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले.

(संग्रहित छायाचित्र)

रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या २९ वर्षीय विनायक परब या तरुणाला सीएसएमटी-पनवेल लोकलवरील मोटरमन व गार्डने मदतीचा हात दिला. जखमी तरुणाला लोकलमधून प्रवाशांच्या मदतीने कुर्ला स्थानकापर्यंत नेले. त्यामुळे सायन रुग्णालयात तरुणावर त्वरित उपचार सुरू करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले.  ही घटना शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

सीएसएमटीहून पनवेल लोकलवर मोटरमन सूर्यकांत पाटील आणि गार्ड बबलू कुमार कार्यरत होते. शनिवारी मध्यरात्री एक वाजता या लोकलने चुनाभट्टी स्थानक सोडताच बाजूच्या रुळांवर विनायक परब जखमी अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी लोकल थांबवत तात्काळ मदतकार्य राबविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 12:56 am

Web Title: motorman saved the young mans life with the help of the guard abn 97
Next Stories
1 दोषी औषध पुरवठादार काळ्या यादीत
2 ‘आनंदी मुंबई’साठी अल्प मतदान
3 ‘एनपीआर’ छाननीसाठी मंत्रिगट
Just Now!
X