29 May 2020

News Flash

मुंबई मेट्रोचा बेजबाबदारपणा; मौनी रॉयच्या गाडीवर कोसळला दगड

या अपघातात तिच्या गाडीचं नुकसान झालं आहे.

मुंबई मेट्रोच्या जुहू येथील बांधकाम परिसरात अभिनेत्री मौनी रॉयच्या गाडीवर मोठा दगड कोसळला. या अपघातात तिच्या गाडीचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. मौनी तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी निघाली होती त्यावेळी हा अपघात घडला.

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मौनीने अपघाताची माहिती दिली. ‘जुहू सिग्नलजवळ गाडी थांबली असताना अकराव्या मजल्याच्या उंचीवरून मोठा दगड माझ्या गाडीवर कोसळला. त्यावेळी जर एखादा व्यक्ती तिथून रस्ता ओलांडत असता तर किती मोठी दुर्घटना झाली असती. मुंबई मेट्रोच्या या बेजबाबदार वागण्यावर काय करता येईल,’ असा प्रश्न तिने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला. यावर अनेकांनी तिला पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.

कोण आहे मौनी रॉय?
छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री मौनीने नुकतीच बॉलिवूडकडे वाटचाल केली आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावर ‘नागिन’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 4:22 pm

Web Title: mouni roy car damaged by falling rock on it at mumbai metro site juhu ssv 92
Next Stories
1 बिग बींच्या मराठी चित्रपटात नीना कुळकर्णी यांची सरप्राइज एण्ट्री
2 प्रेक्षकांना धडकी भरवणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; श्याम रामसे यांचे निधन
3 मुंबईत बलात्काराच्या आरोपाखाली मनसे कार्यकर्त्याला अटक
Just Now!
X