गार्गी, मैत्रेयीसह इतिहासातील प्रभावशाली स्त्रियांचा येत्या काळात इतिहासाच्या पुस्तकात समावेश होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यात येत आहे.
देशभरातील सर्व राज्य मंडळे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांसह खासगी मंडळांसाठी अभ्यासक्रम आराखडा तयार करणाऱ्या ‘एनसीईआरटी’च्या इतिहासाच्या अभ्यासक्रम आराखडय़ात येत्या काळात काही बदल होण्याची शक्यता आहे. संसदीय समितीची नुकतीच याबाबत बैठक झाली. भारताचा इतिहास मांडताना विविध कालखंडांतील इतिहासाला योग्य स्थान मिळावे, इतिहासातील प्रभावशाली स्त्रियांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा या दृष्टीने समिती अहवाल देणार आहे.
सध्या शिक्षण धोरण आराखडय़ानुसार अभ्यासक्रमात आनुषंगिक बदल करण्यासाठी एनसीईआरटीची समिती सध्या काम करत आहे. त्या अनुषंगाने येत्या काळात इतिहासाच्या पुस्तकात मोठय़ा प्रमाणावर बदल होण्याची शक्यता आहे.
‘इतिहासातील काही भाग वस्तुस्थितीनुसार नाही. अनेक मोठय़ा व्यक्तींची चुकीच्या पद्धतीने मांडलेली माहिती किंवा घटक वगळणे, भारतीय इतिहासातील विविध कालखंडांच्या इतिहासाला योग्य प्राधान्य देणे, गार्गी मैत्रेयीसह, राणी लक्ष्मीबाई, चांदबिबी, झलकारी बाई यांचा अभ्यासक्रमांत समावेश करणे,’ असे उद्देश बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत नमूद करण्यात आले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 12:29 am