News Flash

चित्रपटांची ‘एम’ आवृत्ती लोकप्रिय

चित्रपटांची पायरसी हा गेल्या अनेक दशकांपासूनचा न सुटलेला प्रश्न आहे. ही पायरसी मोबाइलमुळे आता अधिकच वाढू लागली आहे. यामुळेच वितरकांनी चित्रपट आणि मालिका मोबाइलवरच अधिकृतपणे

| May 24, 2015 04:14 am

चित्रपटांची ‘एम’ आवृत्ती लोकप्रिय

चित्रपटांची पायरसी हा गेल्या अनेक दशकांपासूनचा न सुटलेला प्रश्न आहे. ही पायरसी मोबाइलमुळे आता अधिकच वाढू लागली आहे. यामुळेच वितरकांनी चित्रपट आणि मालिका मोबाइलवरच अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी काही त्रयस्थ अ‍ॅप कंपन्यांनी त्यांना सहकार्य केले आहे.
काही अ‍ॅप्स ऑनलाइल आहेत तर काही ऑफलाइन आहेत. साधारणत: २०११पासून असे अ‍ॅप्स अ‍ॅप बाजारात दिसू लागले. मात्र सुरुवातीला याला वितरकांकडून आणि ग्राहकांकडून फारसी पसंती मिळत नव्हती. या अ‍ॅपची संकल्पना पुढे आली त्यावेळेस वतरकांना नेमका काय फायदा होईल किंवा याचे व्यावसायिक प्रारूप काय असेल याबाबत साशंकतता होती. तर ग्राहकांना आपल्याला किती पैसे पडतील याबाबत साशंकतता होती. पण कालांतराने या दोन्ही वर्गाला या अ‍ॅप्सचे महत्त्व कळू लागले आणि हे अ‍ॅप्स आता मोबाइलच्या अ‍ॅप्सच्या बाजारात अग्रक्रमावर येऊन बसले आहेत.
कशा पद्धतीने काम?
अशाप्रकारची अ‍ॅप सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या विविध चित्रपट आणि मालिका वितरण कंपन्यांशी करारबद्ध होऊन त्यांचे चित्रपट आणि मालिकांचे काही भाग अधिकृतपणे या अ‍ॅपवर मोफत उपलब्ध करून देतात. मोफत सुविधेमध्ये टीव्हीप्रमाणे जाहिराती येतात पण तुम्हाला अधिकृत आणि चांगल्या दर्जाची प्रत पाहावयास मिळते अशी माहिती ‘स्पूल’ या अ‍ॅप कंपनीचे भारताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव वैद्य यांनी दिली. तर यामध्ये ग्राहकाने मागविलेला एखादा व्हिडीओ त्याच्या मोबाइलमध्ये आल्यापासून ७२ तासांना आपोआप त्याच्या मोबाइलमधून डिलिट होतो . तसेच हा व्हिडीओ कॉपी करणे किंवा शेअर करण्याचा कोणताही पर्याय त्याच्याकडे नसतो यामुळे ही सुविधा वितरकांच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचेही ते म्हणाले.
तर अशा सेवेसाठी ऑफलाइन अ‍ॅप्सही उपलब्ध असून त्याच्यामाध्यमातून साधे फोन असलेल्या ग्राहकांनाही अधिकृतपणे चित्रपट पाहवयास मिळत असल्याचे शॉर्टफॉरमॅटच्या मुख्य कार्यकारी अधिकार आणि व्यवस्थापकीय संचालक नियती शाह यांनी स्पष्ट केले. यामध्ये ग्राहकांनी काही रक्कम भरून तो चित्रपट मिळवला की तो त्यांच्याकडे कायमचा राहतो मात्र तो कॉपी होत नाही. यामुळे वितरकांना सुरक्षा मिळत असल्याचेही शाह यांनी सांगितले.

भविष्य काय?
कंपन्या सध्या विविध माध्यमातून चित्रपटांचे वितरण करत असून अशाप्रकारच्या अ‍ॅपच्या माध्यमातून तळागाळातील प्रेक्षकांपर्यंत व्हिडीओजची अधिकृत प्रत पोहचणे शक्य होत असल्याचे ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंमेंट प्रा. लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल यांनी स्पष्ट केले. भविष्यात थेट मोबाइल उत्पादन करणाऱ्या तसेच मोबाइल नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांशी टायअप करून थेट ग्राहकांना मोबाइलमध्येच व्हिडीओज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

मागणी कशाला?
बॅटरीच्या क्षमतेमुळे अनेकदा लोक कमी लांबीच्या व्हिडीओजना पसंती देतात. यामध्ये एखाद्या चित्रपटातील विनोदी भाग, दृकश्राव्य गाणी, मालिकांचे काही भाग याला विशेष मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2015 4:14 am

Web Title: movies mobile edition famous
Next Stories
1 सक्तीच्या बदल्यांना अधिकाऱ्यांचा विरोध
2 जाणून घ्या.. दहावी आणि बारावीनंतरचा मार्ग यशाचा
3 ‘मॅगी’ अहवालाच्या प्रतीक्षेत
Just Now!
X