News Flash

खासदारपुत्राला वारांगनेने लुटले

उत्तर प्रदेशमधील एका खासदारपुत्राला वारांगना आणि तिच्या दोन साथीदारांनी चाकूचा धाक दाखवून दीड लाख रुपयांना लुटल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे.

| August 19, 2015 12:01 pm

उत्तर प्रदेशमधील एका खासदारपुत्राला वारांगना आणि तिच्या दोन साथीदारांनी चाकूचा धाक दाखवून दीड लाख रुपयांना लुटल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. वाकोला पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेशातील एका खासदाराचा मुलगा काही कामानिमित्त १६ ऑगस्ट रोजी मुंबईत आला होता. त्याने उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खोलीची नोंदणी केली होती. दरम्यान, मौजमजा करण्यासाठी त्याने मित्रासमेवत ‘एस्कॉर्ट सव्र्हिस’शी संपर्क केला होता. या दलालाने काही मुलींची छायाचित्रे त्याला ‘व्हॉटसअॅप’वर पाठवली. त्यातील एक मुलगी या खासदार पुत्राने निवडली. तिला घेण्यासाठी हा खासदारपुत्र खाली गेला. तेथे दलाल मुलीसह आला होता. मात्र काही बोलणे करायचे आहे, असे सांगून दलालाने गाडीत बसवले व  चाकूचा धाक दाखवत आणि मारहाण करत खासदारपुत्राकडील दीड लाख रुपये काढून घेतले व गाडीतून खाली उतरविले. वाकोला पोलिसांत याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 12:01 pm

Web Title: mp son robbed of rs 1 50 lakh by girl
Next Stories
1 टॅब खरेदीप्रकरणी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे धाव
2 लोकांपर्यंत शिवचरित्र पोहोचवण्याचा प्रयत्न केला – बाबासाहेब पुरंदरे
3 बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान
Just Now!
X