एमपीएससी डेटा गहाळ प्रकरणात कोचिंग क्लासचालकांचा हात आहे, याबाबत पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे. मुंबई सायबर सेल पोलिसांच्या पथकाने वास्ट इंडिया कंपनीच्या संचालकाच्या घरातून महत्त्वपूर्ण हार्डडिस्कही जप्त केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या उमेदवारांचा डेटा नष्ट करून परीक्षा लांबविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक विवेक चांडेल (४१) आणि कंपनीचा आयटी तज्ज्ञ वीरेंद्र असोलकर (२५) यांना सायबर सेलने अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलने तीन विशेष पथके स्थापन केली आहेत. चांडेलच्या घाटकोपर येथील घरातून पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण हार्ड डिस्क जप्त केली आहे. हैदराबाद येथील कंट्रोल एस या कंपनीत वास्ट इंडियाचा सव्‍‌र्हर असून सायबर सेलने या कंपनीत जाऊन चौकशी करून तेथील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले. गहाळ झालेला डेटा या कंपनीतील सव्‍‌र्हरमध्ये असून तो लवकरच मिळेल, अशी माहिती सायबर सेलचे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली, तर या प्रकरणी कोचिंग क्लासेसचे काही लागेबांधे आहेत का, त्याचाही तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  या प्रकरणी आम्ही सर्व शक्यता तपासत असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी दिली.

सोयीचा ‘व्हायरस’  
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा ७ एप्रिल २०१३ रोजी होणार होती. या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज भरून घेणे आणि त्यांना प्रवेशपत्र देणे हे काम अंधेरी येथील वास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले होते. परंतु कंपनीने ऐनवेळी व्हायरसचे कारण पुढे करत ३ लाख २२ हजार उमेदवारांचा डेटा नष्ट झाल्याचे सांगितले होते. यामुळे आयोगाला राज्यभरातल्या ९३५ केंद्रावर होणारी परीक्षा सहा महिन्यांसाठी पुढे ढकलावी लागली होती. कंपनीने मागील तीन वर्षांचा डेटाही गहाळ केला होता.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर