News Flash

मुख्यमंत्री महोदय, “गुंडाराज” कधी संपणार? – दरेकर

महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था "भगवान भरोसे" सोडलीय का? असा देखील प्रश्न विचारला आहे.

मुख्यमंत्री महोदय, “गुंडाराज” कधी संपणार? – दरेकर
संग्रहीत

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री महोदय, “गुंडाराज” कधी संपणार? असा प्रश्न दरेकर यांनी विचारला आहे.

“कुणीही यावं, महिलांची अब्रु लुटावी, डोळे फोडून टाकावेत, बालिकांवर अत्याचार करावेत, हे कायद्याचं राज्य आहे का ? आघाडी सरकारने महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था “भगवान भरोसे” सोडलीय का ? नगरची रेखा जरेंची हत्या याच प्रकारातली आहे. या घटनेची निंदा करावी तेवढी थोडी आहे.” असे दरेकर यांनी ट्विट केलं आहे.

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी रेखा जरे यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. हल्ल्यात जखमी झालेल्या रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

आणखी वाचा- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या, घाटात धारदार शस्त्राने वार

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेखा जरे आपल्या कारने अहमदनगरला येत होत्या. यावेळी हायवेवर शिरुरजवळ दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली आणि वाद झाला. यादरम्यान दुचाकीवर स्वार हल्लेखोराने धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 12:01 pm

Web Title: mr chief minister when will gundaraj end darekar msr 87
Next Stories
1 योगी आदित्यनाथ उद्या मुंबईत, बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेण्यासाठी पहिली बैठक
2 कार्यक्रम स्वरूपानुसार उपस्थितांची संख्यामर्यादा हवी – उच्च न्यायालय 
3 ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश
Just Now!
X