एमआयडीसीतील रोटरी उद्यानाजवळील सरकारी भूखंडावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एमआयडीसीने नऊ जणांवर ‘महाराष्ट्र प्रांतिक नगररचना कायद्यांतर्गत’ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये राजकीय मंडळींचा सहभाग आहे. येथे दोन हजार चौरस मीटरचा भूखंड आहे. सात महिन्यांपासून त्यावर नऊ जणांनी दोन इमारती व व्यावसायिक गाळे बांधल्याची तक्रार एमआयडीसीचे उप – अभियंता तुळशीराम बडगुजर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.  या तक्रारीवरून शेखर शिंदे, सूर्यकांत पाठक, नंदुकुमार परब, बाळू पवार, सूरदास म्हात्रे, महेश केणे, सुनील पाटील, सुभाष वानखेडे, प्रफुल्ल गोष्टे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अरुण पठार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.