अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणेच पावसाळी अधिवेशनातही मनसे आपले वेगळे अस्तित्व कायम ठेवून विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी शनिवारी सांगितले.
अधिवेशनात कोणती भूमिका घ्यायची व कोणते प्रश्न मांडायचे यासाठी पक्षाच्या आमदारांची उद्या बैठक बोलाविण्यात आली आहे. भाजप व शिवसेनेबरोबर गेल्यास सभागृहात बोलण्यास फार संधी मिळत नाही व युतीच्या मागे फरफटत जावे लागते म्हणूनच मनसेने युतीची साथ गेल्या वेळी सोडली. राज्यापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत. पक्षाच्या आमदारांनी राज्याच्या विविध भागांमध्ये भेटी देऊन तेथील प्रश्न जाणून घेतले. सभागृहात हे सारे प्रश्न मांडले जातील, असे आमदार नांदगावकर यांनी सांगितले.