25 October 2020

News Flash

एसटी कर्मचारी दुहेरी संकटात

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे वेतन अद्यापही मिळालेले नाही.

मुंबई : एसटीचा कर्मचारी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक समस्या भेडसावत असतानाच दुसरीकडे एसटीत करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे छोटय़ा-मोठय़ा उपचारासाठी कर्मचाऱ्यांना पैशाची गरजही भासत आहे. आतापर्यंत करोनामुळे ७२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून गेल्या पाच दिवसांत पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन एसटीच्या एक लाखाहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाले नव्हते. जुलै महिन्याच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून निधी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ७ ऑक्टोबरला वेतन देण्यात आले. पुढच्या वेतनासाठी राज्य शासनासोबत चर्चा करून लवकरच वेतन देण्याचे आश्वासन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी आश्वासन दिले. परंतु करोनाची लागण झाल्याने गेल्या आठवडय़ातील सोमवारी परब रुग्णालयात दाखल झाले आणि शनिवारी ते घरी परतले. सध्या ते विलगीकरणात आहेत. तर एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्न्ो बिहारला निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून गेले आहेत. त्यामुळे दोघेही उपलब्ध नसल्याने आर्थिक चिंता लागून राहिलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन दिवाळीआधी होणार की नाही, असा प्रश्न पडला आहे.

एसटीची सेवा सुरळीत झाल्याने चालक, वाहकांसह सर्वच कर्मचारी कर्तव्यावर आहेत. आतापर्यंत २ हजार ११० कर्मचारी करोनाबाधित झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:24 am

Web Title: msrtc employees not get salaries for the month of august and september zws 70
Next Stories
1 ओबीसींनाही अतिरिक्त सवलती?
2 व्यायामशाळा दसऱ्यापासून..
3 भानु अथय्यांचा चित्रप्रवास शोधणारा लिलाव
Just Now!
X