मुंबई : लांब पल्ल्याच्या मार्गावर स्वस्त व सुकर प्रवासासाठी एसटी महामंडळाने विनावातानुकूलित स्लीपर बस चालविण्याचा निर्णय घेतला होता. स्लीपर बसची बांधणी पूर्ण होऊनही बस अद्याप सेवेत आलेली नाही. या बसची प्रवाशांना प्रतीक्षाच आहे. दुसरीकडे एसटीच्या वातानुकूलित शिवशाही स्लीपर बसचा प्रवास महागडा ठरत असल्याने विनावातानुकूलित स्लीपर बसमधील प्रवास तरी स्वस्तातला घडेल, अशी आशा आहे.

खासगी प्रवासी वाहतूकदारांकडे गेलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने वातानुकूलित स्लीपर बस सेवेत दाखल केल्या. मात्र महागडा प्रवास ठरत असलेल्या या बस सेवेकडे प्रवाशांनी पाठच फिरविली आहे. दुसरीकडे महामंडळाने स्वस्त प्रवासासाठी एक हजार विनावातानुकूलित स्लीपर बस दाखल करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला होता. परंतु विनावातानुकूलित स्लीपर बसची नोंदणी राज्यात होत नसल्याने अशा गाडय़ांना धावण्यास परवानगी नाही. मात्र महाराष्ट्राबाहेरील बस राज्यात धावू शकतात. निर्माण झालेली ही तांत्रिक अडचण सोडविण्यात आली आणि परिवहन विभाग व केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेकडून एसटी महामंडळाला विनावातानुकूलित बसची नोंदणी व बांधणीची परवानगीही दोन महिन्यांपूर्वीच दिली.

High Court Takes Note of Petition Against Light Pollution from Tree Decorations in Mumbai sent notice to maharashtra government
झाडांवरील दिव्यांची सजावट प्रकाश प्रदुषणासाठी कारणीभूत, उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारसह मुंबई पालिकेला नोटीस
Maruti Suzuki Raises Prices of Select Vehicles Swift and Grand Vitara Included
मारुती सुझुकीकडून निवडक वाहनांच्या किमतीत वाढ
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर

ही परवानगी मिळणे शक्य असल्याने एसटी महामंडळाने दापोडी येथे एका स्लीपर बसची बांधणी आधीच पूर्ण केली होती. तसेच नागपूर ते पुणे या मार्गावर विनावातानुकूलित स्लीपर बसची पहिली सेवा चालविण्याचेही नियोजन केले होते. या नियोजनानंतरही बसची धाव होऊ शकलेली नाही. महामंडळाकडून या प्रकारातील आणखी काही बस गाडय़ांच्या बांधणीचे काम हातीही घेतले आहे.

‘रातराणी’ला पर्याय

सध्या रातराणी स्वरूपाच्या ६०० बस धावत आहेत. या सेवेला पर्याय म्हणून विनावातानुकूलित स्लीपर बस गाडय़ा चालविण्याचे नियोजन आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.