News Flash

एसटीतील आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे

एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

| September 6, 2014 04:40 am

एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याच बैठकीत भाडेवाडीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला त्यामुळे एसटीची भाडेवाढ टळली आहे.
एसटी महामंडळीतील सुमारे एक लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वारसांना या निर्णयाचा फायदा होणार असून राज्य शासनाच्या मान्यतेनंतर भरती प्रक्रियेत पाच टक्के आरक्षणाची सुविधा दिली जाणार आहे. दरम्यान, डिझेलच्या वाढत्या दरांप्रमाणे १.७९ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र तो नामंजूर करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 4:40 am

Web Title: msrtc reservation proposal to govt
टॅग : St Bus
Next Stories
1 आयआयटीमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू
2 उरणमधील नदीपात्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू
3 दुचाकी अपघातात चार तरुण ठार
Just Now!
X