News Flash

वर्षभरात ‘शिवशाही’चे १३१ अपघात

राज्यात २०२०-२१ मध्ये (एप्रिल ते मार्च) शिवशाहीचे १२४ अपघात झाले.

मुंबई: एसटी महामंडळात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस त्याच्या सुविधांपेक्षा अपघातांमुळेच जास्त चर्चेत आहे. साडेचार वर्षापूर्वी शिवशाही बस सेवेत आल्यापासून होत असलेल्या अपघातांचे सत्र थांबलेले नाही. गेल्या वर्षभरात शिवशाहीचे १३१ अपघात झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर १२६ जखमी झाले आहेत. झालेल्या अपघातांमध्ये एसटी महामंडळाच्या मालकीच्या शिवशाही बसचे अपघातच अधिक आहेत.

एसटी महामंडळाने जून २०१७ मध्ये शिवशाही या वातानुकूलित बस दाखल केल्या. यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा समावेश होता. प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर शिवशाहीला प्रथम अपघातांनी गालबोट लावले. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये शिवशाहीचे सुमारे २२१ अपघात झाले. त्याआधीच्या वर्षी ही संख्या २४० होती. अपघात घटले तरी त्याला पूर्णपणे आळा बसला नाही. सध्या एसटीच्या ताफ्यात मालकीच्या ९०० बस आणि भाडेतत्वावरील ४०० बस आहेत.

राज्यात २०२०-२१ मध्ये (एप्रिल ते मार्च) शिवशाहीचे १२४ अपघात झाले. यात ११७ अपघात एसटीच्या मालकीच्या बसचे, तर भाडेतत्वावरील बसचे सात अपघात झाले. यामध्ये ११९ जण जखमी आणि ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. एप्रिल २०२१ ते जून २१ पर्यंत एकू ण सात अपघात झाले. यामध्येही एसटीच्या शिवशाहीचे चार आणि भाडेतत्वावरील तीन बसचे अपघात असून सात जण जखमी झाले. यातील ५३ अपघात हे किरकोळ आहेत. एक लाख किलोमीटरमागे ०.१६ एवढे अपघाताचे प्रमाण असून अपघात कमी होत असल्याचे सांगितले.

स्वत:च्या मालकीच्या शिवशाही बस गाडय़ांवर एसटीचेच चालक, तर भाडेतत्वावरील वाहनांवर त्याच

कं पनीकडून कं त्राटी चालक नेमण्यात येतात. वेगाने वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे इत्यादी प्रकारे अपघात झाल्याची नोंद सुरुवातीपासूनच होत आहे. शिवशाही चालवताना एसटीच्या चालकांना सुरुवातीपासूनच समस्या येत होती. त्यामुळे चालकांच्या प्रशिक्षणाबाबतच मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे महामंडळाने या बसच्या चालकांना सेवेत आल्यापासून प्रशिक्षण देण्याचे कामही टप्प्याटप्प्यात सुरू केले. हे प्रशिक्षण सुरुच असते, असे सांगण्यात आले. भाडेतत्त्वावरील शिवशाही बस पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी परतीच्या प्रवासात नवीन चालक देण्याची सूचनाही के ल्याने त्यावर चालक देण्याचे काम के ले.

स्वमालकीच्या बसवर भर

करोनाकाळात एसटीच्या शिवशाही कमी प्रमाणात धावल्या. गेल्या वर्षी आणि यंदाच्या वर्षात टाळेबंदी शिथिल झाली, तरीही प्रवासी कमी असल्याने एसटी महामंडळाने स्वमालकीच्या शिवशाही बसच चालवण्यावर भर दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 1:48 am

Web Title: msrtc shivshahi ac buses accident akp 94
Next Stories
1 कारवाईच्या भीतीने राज कुंद्राकडून पर्यायी योजना
2 जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस
3 कारवाईविरोधात कंगना उच्च न्यायालयात
Just Now!
X