अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल उद्या (बुधवारी) जाहीर करण्यात येणार आहे. या वर्षी विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
१६ मे रोजी झालेल्या या परीक्षेला २,८५,११२ विद्यार्थी बसले होते. परीक्षेचा निकाल बुधवारी सकाळी ११ वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या www.dte.org.in/mtcet2013 या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ९ जूनपर्यंत फेरपडताळणीसाठी अर्ज करता येईल.
विद्यार्थ्यांना आपल्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका व उत्तरतालिका ६ ते १३ जूनपर्यंत संकेतस्थळावर पाहता येईल. त्यांच्या लॉग इन आयडीवर त्या उपलब्ध असतील. १३ जूनला विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयात गुणपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे प्रभारी तंत्रशिक्षण संचालक दयानंद मेश्राम यांनी कळविले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 5, 2013 4:27 am