महानगर टेलिफोन निगमची दिवसेंदिवस बिघडणारी सेवा सुधारण्यासाठी तसेच सुधारित वेतनश्रेणीसह प्रलंबित मागण्यांसाठी एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांनी येत्या ८ डिसेंबर रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले आहे. शिवसेनेचे कामगार नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी हे आंदोलन पुकारले आहे.

बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी २०१३ मध्ये संप केल्यानंतर त्यांना ७२ टक्के महागाई भत्त्यासह नवीन वेतनश्रेणी दिली, मात्र एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना आजतागायत जुनीच वेतनश्रेणी देण्यात येत आहे. याशिवाय मोबाइल आणि दूरध्वनी सेवेसाठी विभागाकडून जुनाट उपकरणे व यंत्रणा पुरविण्यात येत असल्यामुळे त्याचा परिणाम चांगली सेवा देण्यावर होत आहे. त्यामुळे अद्ययावत यंत्रणा विभागाला उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.