उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी तपास करणाऱ्या एनआयएने अटकेत असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या मोठ्या कटाचा उलगडा केला आहे. एनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या वाहन प्रकरणी दोघांची हत्या करुन त्यांना या प्रकरणात गोवण्याची शक्यता होती. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन वाझे यांच्या निवासस्थानी एक पासपोर्ट सापडला असून हा या प्रकरणातील महत्वाचा पुरावा ठरु शकतो. एनआयए सध्या या प्रकरणात एन्काऊंटरचा काही प्लॅन होता का याची माहिती घेत आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे पासपोर्ट सापडला आहे त्याच्यासह आणखी एका व्यक्तीची हत्या करण्याचा कट आखला होता. यानंतर अंबीनींच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरेल्लाय वाहन प्रकरणात त्यांना गुंतवलं जाणार होतं.

आणखी वाचा- सचिन वाझे यांच्या बडतर्फीसाठी हालचाली

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडलं होतं. कटानुसार, एनआयएने ओळख उघड करण्यास नकार दिलेल्या त्या दोन व्यक्तींची त्याच दिवशी हत्या केली जाणार होती. नंतर सचिन वाझे प्रकरणाचा उलगडा केल्याचं श्रेय घेणार होते. १७ मार्चला सचिन वाझेंच्या घरावर धाड टाकली असता हा पासपोर्ट मिळाला होता.

आणखी वाचा- सचिन वाझेंची अजून काहीतरी मोठं करण्याची योजना होती! – एनआयए

मिळालेल्या माहितीनुसार, ते दोन व्यक्ती औरंगाबाद येथून चोरण्यात आलेली Maruti Eeco कार चालवणार होते आणि स्फोटकांसह अंबानींच्या घराबाहेर पार्क करणार होते. एनआयएने मिठी नदीतून गाडीची नंबरप्लेट मिळवली आहे. पण सचिन वाझे यांना नशिबाने साथ दिली नाही आणि ही योजना फसली. यानंतर त्यांनी बी प्लॅन वापरला ज्यामध्ये मनसुख हिरेन यांच्या मालकीचं वाहन तिथे पार्क करण्यात आलं.

मनसुख हिरेन यांच्या हत्येची माहितीही सचिन वाझे एटीएससमोर देणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. सचिन वाझे एन्काऊंटर स्पेशलिस्ट असतानाही योजना अत्यंत वाईट पद्दतीने आखण्यात आल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान अद्यापही मनसुख हिरेन यांचा गळा नेमका कोणी दाबला हे स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान सचिन वाझे यांनी अटकेच्या एक दिवस आधी वापरलेला फोन अद्यापही तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. फोन होत लागल्यास अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani antilia bomb case sachin vaze may have planned to kill 2 sgy
First published on: 14-04-2021 at 16:07 IST