News Flash

मुकेश अंबानी यांच्या ‘सीआरपीएफ’ सुरक्षेला उच्च न्यायालयात आव्हान

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना ‘सीआरपीएफ’ची ‘झेड’ सुरक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात नितीन देशपांडे आणि विक्रांत कर्णिक या सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका

| July 2, 2013 04:11 am

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना ‘सीआरपीएफ’ची ‘झेड’ सुरक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात नितीन देशपांडे आणि विक्रांत कर्णिक या सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
इंडियन मुजाहिदीनकडून अंबानी यांना धमक्या येत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे करण्यात आली होती. ‘सीआरपीएफ’ची स्थापना केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ला आदी परिस्थितींचा त्यातसमावेश असल्याने अंबानी यांना ही सुरक्षा देण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने ‘सीआरपीएफ’ कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 4:11 am

Web Title: mukesh ambani crpf security challenge to the high court
Next Stories
1 राज्यातील प्रशासकीय अधिकाऱयांच्या बदल्या
2 अजितदादांपाठोपाठ मुंडेंना बोलघेवडेपणा नडला!
3 एसटी करार : उत्पादकतावाढीरून कामगार – अधिकाऱ्यांमध्ये वाद
Just Now!
X