News Flash

Loksatta Tarun Tejankit: गेल्या वर्षी मुक्ता बर्वेनं मारली बाजी! यंदा तुमचा नंबर?

तुम्हीही यंदाच्या 'लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी नावनोंदणी करु शकता

मुक्ता बर्वे

‘गर्ल नेक्स्ट डोअर’ म्हणून ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे गेल्या वर्षी ठरली होती ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराची मानकरी! कला क्षेत्रातील योगदानासाठी मागील वर्षी मुक्ताला सन्मानित करण्यात आले. झी टीव्हीच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेतून घराघरांत आदर्श सुनेची छबी मांडणारी राधा असो किंवा ‘मुंबई-पुणे- मुंबई’मधील मुंबईकरीण गौरी, ‘डबल सीट’मधील घरस्वप्नांकित मध्यमवर्गीय मंजिरी नाईक असो किंवा ‘जोगवा’मधील जोगतीण सुली, प्रत्येक भूमिका जिवंत जगलेल्या मुक्ता बर्वेचे दर्शन घडते. मुक्ताबरोबरच कला क्षेत्रातील योगदानासाठी निपुण धर्माधिकारीलाही गौरवण्यात आलं होतं. तुम्हीही कला क्षेत्रामध्ये ठसा उमटवलाय ? तुमची ओळखही उत्तम कलाकार अशी आहे का? उत्तर हो असल्यास तुम्हीही यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी अर्ज करु शकता. कसा कुठे कधी जाणून घ्या येथे क्लिक करुन

नक्की वाचा >> पहिल्या पर्वातील विविध क्षेत्रांमधील १२ लखलखते हिरे

वाचा >> ‘तरुण तेजांकित’ला भरभरून प्रतिसादाची झळाळी

साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत तरुण पाय रोवून काम करत आहेत. विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहात आहेत. नवे मानदंड निर्माण करत आहेत. त्यांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून करण्यात येते. गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत १२ तरुण प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात आला.

यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वालाही भरभरून प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंतांच्या आग्रहास्तव नावनोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नावनोंदणीसाठी.. : लखलखत्या हिऱ्यांचे यंदाचे शोधपर्व सुरू झाले आहे. त्यासाठी तरुणांनी  http://taruntejankit.loksatta.com/methodology/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जात माहिती भरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरांनाही आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवता येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2019 1:28 pm

Web Title: mukta barve won loksatta tarun tejankit award now its your turn
Next Stories
1 मुंबईकरांच्या विमान प्रवासाचे दर गगनाला, तिकीट दरांमध्ये 20 ते 50 टक्क्यांची वाढ
2 तेलतुंबडेप्रकरणी पोलिसांना पाठिंब्याची गरज : उद्धव ठाकरे
3 शिवस्मारक: शिवरायांचा अश्वारुढऐवजी उभा पुतळा उभारणार?
Just Now!
X