03 August 2020

News Flash

मुकुल शिवपुत्र यांच्या ‘प्रात:स्वरा’ने श्रोते मंत्रमुग्ध!

सुरुवातीच्या आलापीनंतर मुकुल यांनी ‘अहीर भैरव’ त्यानंतर ‘देव गंधार’च्या अंगाने थोडा वेळ ‘देस’ही सादर केला.

गायक पं. मुकुल शिवपुत्र यांचा वाढदिवसानिमित्त ‘हंसध्वनी’ या संस्थेतर्फे पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला.

पंचम निषाद आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रात:स्वर’ या मैफलीत ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. मुकुल शिवपुत्र यांच्या स्वराने श्रोते मंत्रमुग्ध झाले. तीन तंबोरे, तबला, पखवाज आणि संवादिनीच्या साथीने मुकुल यांनी उपस्थित रसिकांवर सुरांची बरसात केली.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरच्या आवारात असलेल्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात मुकुल शिवपुत्र यांचे गायन ऐकण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि अन्य मान्यवर या मैफलीला उपस्थित होते.
सुरुवातीच्या आलापीनंतर मुकुल यांनी ‘अहीर भैरव’ त्यानंतर ‘देव गंधार’च्या अंगाने थोडा वेळ ‘देस’ही सादर केला. नुकतीच होळी होऊन गेल्याने ‘होरी’ही सादर झाला. फक्त शब्द निर्गुणी भजनाचे आणि आविष्कार होरीच्या थाटाने जाणारा, असे त्याचे वेगळेपण होते. रंगलेल्या या मैफलीची सांगता शिवपुत्र यांनी कुमार गंधर्व यांच्या ‘तुकाराम दर्शन’मधील ‘हे चि माझे तप, हे चि माझे दान, हे चि अनुष्ठान नाम तुझे’ या संत तुकारामांच्या अभंगाने केली. या कार्यक्रमाच्या दिवशी शिवपुत्र यांचा साठावा वाढदिवस होता. त्या निमित्ताने ‘हंसध्वनी’ या संस्थेतर्फे त्यांना पुणेरी पगडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2016 1:22 am

Web Title: mukul shivputra pl deshpande maharashtra kala academy
Next Stories
1 ब्लॉग बेंचर्समध्ये ‘बेदिलीचे बादल’ अग्रलेखावर मत मांडा
2 नांदेडच्या शेतकऱ्याची मंत्रालयासमोर आत्महत्या
3 पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला बॅग परत
Just Now!
X