अखिलेश यांचे नवे सूत्र

पंतप्रधानपदी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग आणि उपपंतप्रधानपदी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अशी सत्ताविभागणी झाल्यास काँग्रेससोबत युती होऊ शकते, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केले. राहुल यांनी मात्र त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. उत्तर प्रदेशात २०१७मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाशी युती होऊ शकते का, या प्रश्नावर नकारार्थी उत्तर दिले.