News Flash

मुलुंड कचराभूमीतील कचरा तळोजाला

मुलुंड कचराभूमी बंद करून जमीन पुनर्वापरात आणण्याचा पालिकेचा मानस आहे.

सग्रहित छायाचित्र

क्षमता संपुष्टात आल्यामुळे मुलुंड कचराभूमी बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून मुलुंड कचराभूमीतील कचरा तळोजा येथे उपलब्ध झालेल्या भूखंडावर हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुलुंड कचराभूमी बंद होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईमध्ये दर दिवशी सुमारे ९ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमींमध्ये टाकला जातो. या तिन्ही कचराभूमींची क्षमता संपुष्टात आली आहे. मात्र तरीही तेथे कचरा टाकण्यात येत आहे. मुलुंड कचराभूमीची क्षमता संपुष्टात आल्याने ती बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. महापालिकेला तळोजा येथे ३८ हेक्टरपैकी ११ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड मिळाला असून मुलुंड कचराभूमीतील कचरा तळोजा येथे टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मुलुंड कचराभूमी बंद करून जमीन पुनर्वापरात आणण्याचा पालिकेचा मानस आहे. ही कचराभूमी १९७० मध्ये कार्यान्वित करण्यात आली. आजघडीला या कचराभूमीत ७० लाख मेट्रिक टन कचरा साचला आहे. यापैकी ६० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून जमिनीचा पुनर्वापर करण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यासाठी मिटकॉन या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यावर पालिकेने शिक्कामोर्तब केले आहे. त्यासाठी या कंपनीला पालिका तब्बल सात कोटी रुपये देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. त्या वेळी स्थायी समिती सदस्यांनी मुलुंड कचराभूमीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

मुलुंड कचराभूमीतील कचरा तळोजाला पाठविण्यात येणार असल्याचे सूतोवाच भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी त्या वेळी केले होते. मनोज कोटक यांनी गुरुवारी पुन्हा एकदा प्रशासनावर टीका केली. या प्रकल्पामध्ये पालिकेची जागा कंत्राटदाराला देण्यात येणार असेल, तर कंत्राटदार त्याचे पैसे देणार का, असा सवाल मनोज कोटक यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 3:53 am

Web Title: mulund garbage land issue taloja
Next Stories
1 अरुंद रस्त्यांवर पदपथाचा ‘वन-वे’
2 सफाई कामगारांच्या चौक्यांचा प्रश्न ऐरणीवर
3 ‘आरटीई’तील रिक्त जागांसाठी दुसरी प्रवेश फेरी
Just Now!
X