News Flash

मुलुंड : नो पार्किंगवरून हटकलं म्हणून दुकानदारानं वाहतूक पोलिसालाच केली शिवीगाळ!

अंगावर धावूनही गेला; गुन्हा दाखल

संग्रहीत

मुलुंड येथील आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी उभी करणाऱ्या दुकानदाराने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. जतीन सतरा असे त्या दुकानदाराचे नाव आहे.

आज आरआरटी रोडवर मुलुंड वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप हे नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करीत होते. या वेळी जतीनच्या दुकाणासमोर त्याची दुचाकी उभी असल्याने पोलिसांनी कारवाई केली.

यामुळे संतापलेल्या जतीनने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागला. अखेर वाहतूक पोलिसांनी मुलुंड पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी जतीनला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वाहतूक पोलीस आता मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 9:44 pm

Web Title: mulund shopkeeper insults traffic police msr 87
Next Stories
1 रेमडेसिवीरच्या वापराने मृत्यूदर कमी होत नाही- डॉ राहुल पंडित
2 करोना रुग्णांवरील उपचारासाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल
3 मुंबईसाठी दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन
Just Now!
X