News Flash

“मॉलमध्ये हॉस्पिटल याआधी कधीच पाहिलेलं नाही,” मुंबईतील आगीनंतर महापौरांचं वक्तव्य

भांडुपमध्ये रुग्णालयाला भीषण आग

(Photo: Kishori Pednekar Twitter)

मुंबईत भांडुपमध्ये रुग्णालयाला भीषण आग लागली असून नऊ तासानंतरही आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. करोना रुग्ण दाखल असणाऱ्या या रुग्णालयात लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून काहीजण अडकल्याची भीती आहे. जवळपास ७० करोना रुग्णांची रुग्णालयातून सुटका करण्यात आली आहे. मॉलमध्ये असणाऱ्या रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे.

भांडुपमध्ये रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ड्रीम्स मॉल सनराइज हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. मुंबईत एकीकडे करोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत असतानाच आग लागल्याची ही घटना घडली. गुरुवारी मुंबईत तब्बल ५५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

आणखी वाचा- भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; कारवाईचा इशारा देत म्हणाले…

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरदेखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये रुग्णालय पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ७० रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आगीचं कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- मुंबई – भांडुपमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. “आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री १२.३० वाजता रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या २२ ते २३ गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत,” अशी माहिती पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी एएनआयला दिली.

“७३ पैकी ३० रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आलं असून तिघांना फोर्टीस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. याशिवाय इतर रुग्ण हॉस्पिटलच्या इतर वॉर्डमध्ये दाखल आहेत,” अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 9:00 am

Web Title: mumai mayor kishori pednekar bhandup hospital fire sgy 87
Next Stories
1 मुंबई – भांडुपमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू
2 मुंबईत रक्ताचा मोठा तुटवडा
3 coronavirus : धारावीतही रुग्णवाढ
Just Now!
X