जेव्हा मुंबई एक किलोमीटर लांब व अर्धा किलोमीटर रुंद, एवढीच होती तेव्हा मुंबईतलं सगळ्यात जुनं मार्केट या भागात होतं व त्याला ब्रेड मार्केट म्हणत. आजही रस्त्याचा इथला फलक सांगतो ब्रेड मार्केट स्ट्रीट. मिंट रोड जवळच्या याच भागात भारतीय शैलीतलं कारंजं आहे, जे रतनजी मूळजी जेठा या भाटिया समाजाच्या गृहस्थानं आपल्या दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ बांधलं. मुंबई महापालिकेनं जशा होत्या तशा स्वरुपात जतन केलेल्या आणखी काही जागा आहेत, ज्यांचा इतिहास सांगतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.