News Flash

मुंबईच्या साकीनाका परिसरात मिठाईच्या दुकानाला भीषण आग; १२ जणांचा होरपळून मृत्यू

या आगीमुळे दुकानाचा काही भाग कोसळला.

मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील राजेदाहे गावात घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

मुंबईच्या साकीनाका परिसरात सोमवारी सकाळी एका दुकानाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत येथील १२ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  येथील खैरानी रोडवर असलेल्या भानू फरसाण या मिठाईच्या दुकानाला आज सकाळी भीषण आग लागली. भानू फरसाणच्या गाळा क्रमांक १ मध्ये ही भीषण आग लागली होती. या आगीमुळे दुकानाचा काही भाग कोसळला. या ढिगाऱ्याखाली तब्बल १८ जण अडकल्याची शक्यता आहे. त्यापैकी ११ जणांना बाहेर काढलं आहे, तर अजूनही चार जण अडकले आहेत. सर्व जखमींना नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साकीनाक्याच्या खैरानी रोडवरील मखारीया कम्पाऊंडमध्ये असलेल्या भानू फरसाण गाळा नंबर-१ या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. यावेळी भानू फरसाण दुकानासह इतर दुकानातील कामगार झोपेत होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे काही कळायच्या आत १२ कामगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या कम्पाऊंडमध्ये वेल्डिंगची दुकाने आहेत. बहुतेक दुकाने लाकडी असल्याने आग भराभर पेटली. तसेच पहाटेच्या वाऱ्यामुळे ही आग आणखीनच भडकली. झोपेत असल्यामुळे कामगारांना आग लागल्याचे खूपच उशिरा लक्षात आले. तोपर्यंत आगीच्या ज्वाळांनी चोहोबाजूंनी त्यांना घेरले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत १२ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 10:25 am

Web Title: mumbai 10 people dead in a fire that broke out at a shop on khairani road in mumbai in the early morning hours
Next Stories
1 गुजरातमधील निकालामुळे शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्सची ६०० अंकांनी घसरगुंडी
2 नाताळ सुट्टीत बसभाडय़ात वाढ
3 मध्य रेल्वेचे वेळापत्रक घसरलेलेच
Just Now!
X