सोशल मीडियावर सध्या टिकटॉक अॅपचा बोलबाला आहे. याचे लाखो युजर असून अनेकजण आपल्यातील सुप्तगुण यावरील व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडतात. टिक टॉकवरील व्हिडीओमुळे अनेकजण लोकप्रिय झाले. अनेकांना टिकटॉकची भूरळ पडली आहे. टिकटॉकमुळे प्रसिद्ध झालेल्या एका १६ वर्षीय तरूणाला भेटण्यासाठी मुंबईतील १४ वर्षीय मुलीनं घर सोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेपाळमधील रियाज अलीचा दिल्लीमध्ये असणाऱ्या कार्यक्रमासाठी आणि भेटण्यासाठी मुंबईतील १४ वर्षाच्या मुलीनं घर सोडलं होतं. घर सोडताना त्या मुलीनं आईला भावनिक पत्रही लिहलं आहे. वेळीच वडाळा पोलिसांनी त्या मुलीची समजूत काढून घरी पाठवलं.

घरात आईसाठी भावनिक पत्र लिहून मोबाईल घेऊन मुलगी निघाली होती. पोलिसांना माहिती समजताच त्यांनी लोकेशन ट्रेस करत मुंबईतच मुलीला रोखलं. हा सर्व प्रकार शनिवारी झाला होता. रविवारी आरपीएफ पोलिसांनी तिचा ताबा घेत तिला बालसुधारगृहात ठेवले. दुसऱ्या दिवशी रविवारी वडाळा पोलिसांनी  मुलीचा ताबा घेत तिच्या घरातल्यांकडे सुखरूप सूपूर्द केले.