मोक्याच्या जागेवरील घरांच्या दराचा विचार करता मुंबई हे जगातील १६ वे सर्वात महाग शहर असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. ‘नाइट फ्रँक’ या मालमत्ता क्षेत्रातील कंपनीने घरांच्या जागांच्या दराबाबत आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण केले. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांवरील निवासी जागेचे दर हे सरासरी ५७ हजार रुपये प्रति चौरस फूट असे आहेत. तसेच २०१२ मध्ये मुंबईतील जागांचे दर अध्र्या टक्क्याने वाढल्याचे आढळून आले, असेही या सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कफ परेड, कुलाबा, मलबार हे परिसर निवासी जागांचा विचार करता मुंबईतील मोक्याची ठिकाणे आहेत.
निवासी जागांच्या दराच्या बाबतीत मोनाको, हाँगकाँग, लंडन, जीनिव्हा आणि पॅरीस या शहरांचा क्रमांक पहिल्या पाच सर्वात महाग शहरांत लागतो, असे या सर्वेक्षणात आढळून आले.