News Flash

विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे करणाऱ्या ७४ वर्षांच्या वृद्धाला अटक

शिकवणीसाठी घरी येणाऱ्या विद्यार्थीनींसोबत करायचा चाळे

शिकवणीदरम्यान अश्लिल चाळे

खास प्रतिनिधी, मुंबई

शिकवणीसाठी घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एका अल्पवयीन विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून व्ही. पी. मार्ग पोलिसांनी ७४ वर्षांच्या वयोवृद्धाला अटक केली. शिकवणीदरम्यान अश्लिल चाळे, स्पर्श केल्याचा आरोप वृद्धावर आहे. शिकवणीतील अन्य विद्यार्थी, विद्यार्थीनींसोबतही असा प्रसंग घडला आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्यास आहे. यातील आरोपी आरोपी वृद्ध सेवानिवृत्त आहेत. तर त्याची पत्नी निवृत्त शिक्षिका असून घरी शिकवणी घेते. तक्रारदार विद्यार्थीनी १२ वर्षांची असून ती सातव्या इयत्तेत शिकते. तिने केलेल्या आरोपांनुसार दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. शिक्षिका स्वयंपाकगृहात किंवा अन्य खोलीत गेल्या की आरोपी संधी साधे.

मंगळवारी विद्यार्थीनीने हा प्रकार आईला सांगितला. आईने पोलीस ठाणे गाठले. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपी वृद्धाला बलात्कार, विनयभंग, लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमातील(पॉक्सो) विविध कलमांनुसार अटक केली. पोलीस शिकवणीला येणाऱ्या अन्य विद्यार्थी व पालकांकडे चौकशी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 12:57 pm

Web Title: mumbai 74 year old held for sexually assaulting girl
Next Stories
1 ठाणे : धावत्या लोकलमध्ये आढळला साप, प्रवाशांमध्ये गोंधळ
2 बेकायदा बांगलादेशींचा शोध घेण्यासाठी मुंबईतही एनआरसी लागू करा: राज पुरोहित
3 लोकलमधल्या ‘त्या’ टवाळखोर स्टंटबाजांना शोधलं, पोलिसांनी घातल्या बेड्या
Just Now!
X