मुंबईतील बीकेसी येथे आठ वर्षांच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी घरात एकटी असताना चोरट्याने तिच्या घरात प्रवेश केला आणि चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर नराधमाने पीडितेच्या घरातील ६० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
मुंबईतील बीकेसी परिसरात राहणारी आठ वर्षांची मुलगी सोमवारी घरी एकटीच होती. यादरम्यान एक चोरटा त्यांच्या घरात घुसला. त्याने मुलीला चाकूचा धाक दाखवत तिला ओढणीने बांधले. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर नराधमाने मुलीच्या घरातील १५ हजार रुपये रोख आणि ४५ हजारांचे दागिने घेऊन पळ काढला. पीडित मुलीचे कुटुंबीय घरी परतल्यावर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी बलात्कार, जबरी चोरी आणि अन्य कलमांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
First Published on September 11, 2018 1:32 pm