01 March 2021

News Flash

मुंबईत दिवसभरात ९२१ रुग्ण

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.

संग्रहीत छायाचित्र

मुंबई : मुंबईतील करोना रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असून, रविवारी नवीन ९२१ बाधितांची नोंद झाली, तर ४ जणांच्या मृत्यू झाला. चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाणही (पॉझिटिव्हिटी रेट) वाढले असून, हा दर चार टक्क्यांवरून सहा टक्क्यांच्याही पुढे गेला आहे. मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत गेल्या पंधरा दिवसात तिपटीने वाढ झाली आहे. १ फे ब्रुवारीला ३२८ रुग्ण आढळले असताना त्यानंतर मात्र दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी तर ही रुग्णसंख्या हजाराच्या जवळ पोहोचली.

रविवारी ९२१ नवीन रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३,१९,१२८ झाली आहे. तर एका दिवसात ५४० रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत २ लाख ९९ हजाराहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही हळूहळू वाढू लागली असून सध्या ७२७६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णाची संख्या अधिक आहे. सुमारे ४५९२ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत तर सुमारे २०४३ रुग्णांना लक्षणे आहेत. तर २६५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. शनिवारी १६,१३५ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सहा टक्क्याहून अधिक अहवाल बाधित आले आहेत. तर ४३०० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ४ टक्के अहवाल बाधित आले आहेत. आतापर्यंत ३१लाख ३३ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.

रविवारी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १ पुरुष व ३ महिला होत्या.  मृतांची एकूण संख्या ११,४४२ वर गेली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर आणखी वाढून ०.२० टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधीही ३४६ दिवसांपर्यंत खाली गेला आहे.

मुंबईत आता सर्वच भागात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुलुंड, वांद्रे, चेंबूर, वडाळा, सायन, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, ग्रँटरोड, भांडुप, देवनार या भागात रुग्णवाढ सर्वात अधिक आहे.

पालिकेने रुग्णांच्या निकट संपर्कातील लोकांचा शोध घेण्याची कारवाई कठोर पावले उचलली असून शनिवारी एका दिवसात  रुग्णांच्या निकटचे ११,४४९ संपर्क शोधले आहेत.

देशात १४,२६४ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली असून, गेल्या २४ तासांत १४,२६४ नवे बाधित आढळले. दिवसभरात ९० रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची एकूण संख्या १,५६,३०२ वर पोहोचली आहे. देशभरात सध्या १,४५,६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.३२ टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 1:29 am

Web Title: mumbai 921 corona patient akp 94
Next Stories
1 मुखपट्टीविना फिरणाऱ्या १६ हजार १५४ जणांवर कारवाई
2 चुकीला माफी नाही! मुंबई महापालिकेच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट व क्लबवर धाडी
3 मुंबईतील खळबळजनक घटना: लग्नाला दिला नकार… तरूणीला धावत्या लोकलसमोर ढकललं
Just Now!
X