News Flash

पाच वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या पत्नीच्या इच्छेखातर पतीकडून नागरिकांना मोफत ऑक्सिजन पुरवठा!

राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे रूग्णांचे हाल सुरू असल्याचे दिसत आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज लाखांच्या सख्येत नवीन करोनाबाधित वाढत आहे. परिणामी आरोग्ययंत्रणा कोलडमडत आहे. रूग्णालयांमध्ये तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन, लस आदींचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रूग्णांचा मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्र सरकारसह खासगी कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मागणी केली जात आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे, जादा पैसे देऊन देखील वेळेत ऑक्सिजन मिळत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे अशी गंभीर परिस्थिती असतानाही माणुसकीचं दर्शन घडवणारं कामही समाजात सुरू असल्याचं दिसून आलं आहे. मुंबईतली एका मंडप डेकोरेटरने नागरिकांना मोफत ऑक्सिजन पुरवठा करण्याचे कार्य सुरू केलं आहे.

मुंबईतील मंडप डेकोरेटर असलेले पास्कर सलधाना यांच्या पत्नीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे त्या मागील पाच वर्षांपासून डायलिसिस व ऑक्सिजनवर आहेत. मात्र अशा परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जपत पत्नीच्या इच्छेखातर पास्कल सलधाना हे नागरिकांना मोफत ऑक्सिजन पुरवठा करत आहेत.

”माझी पत्नी डायलिसिस व ऑक्सिजनवर आहे. त्यामुळे आमच्याकडे एक अतिरिक्त सिलिंडर नेहमीच असते. एकदिवस शाळेच्या मुख्यध्यापकांनी मला फोन करून त्यांच्या पतीसाठी ऑक्सिजनची मागणी केली. माझ्या पत्नीने आग्रह केल्यानंतर मी त्यांना माझ्याकडील एक अतिरिक्त सिलिंडर दिला. यानंतर तिच्या विनंतीवरून मी तिचे दागिणे विकले यातून मला ८० हजार रुपये मिळाले आणि मी हे कार्य सुरू केले. १८ एप्रिल पासून मी हे काम करत असून, आता यासाठी मला अनेक लोक आर्थिक मदतही करत आहेत.” असं पास्कल सलधाना यांनी सांगितलं आहे.

Corona Crisis : ऑक्सिजन पुरवठ्याच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं!

देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा व इतर धोरणां संबंधीच्या मुद्यांवर सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी ऑक्सिजन पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत एक अशी व्यवस्था बनवली जावी, ज्याद्वारे लोकांना कळाले पाहिजे की ऑक्सिजनचा किती प्रमाणात पुरवठा केला गेला आहे आणि कोणत्या रूग्णालयात किती ऑक्सिजन उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 3:09 pm

Web Title: mumbai a mandap decorator pascal saldhana supplies oxygen for free to people at the request of his wife msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 १७६ एकल स्तंभांवर सागर किनारा पूल
2 आजचे भागले, उद्याचे काय?
3 बेघर, भिक्षेकऱ्यांच्या भोजनासाठी पालिकेचा पुढाकार
Just Now!
X