News Flash

मुंबईतील नेहरु नगर भागात महिलेवर सामूहिक बलात्कार, चारजण अटकेत

याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील नेहरुनगर भागात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चारजणांना अटक केली आहे. या चारही जणांची चौकशी सुरु आहे. मुंबईतील नेहरू नगर भागात एका महिलेवर सोमवारी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांची पुढील चौकशी करण्यात येते आहे.

Mumbai: A woman was allegedly gang-raped in Nehru Nagar area last night. Case registered, all 4 accused have been arrested. Further investigation underway. #Maharashtra

— ANI (@ANI) January 21, 2020

पीडित महिला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नेहरु नगर भागात होती. ती कुर्ला रेल्वे स्थानकावरुन उतरुन लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी पायी जात होती. त्यानंतर ती झुडपांमध्ये लघुशंकेसाठी गेली असता चारजणांनी या महिलेवर बलात्कार केला.

पीडित महिलेचे २८ हजार रुपये आणि मंगळसूत्र खेचून घेऊन हे चौघे जात होते. त्यावेळी या महिलेने १०० या क्रमांकावर फोन केला असता पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी लोकांच्या मदतीने चारपैकी दोन आरोपींना तातडीने अटक केली. तर इतर दोन आरोपींना आज अटक करण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 2:33 pm

Web Title: mumbai a woman was allegedly gang raped in nehru nagar area last night four arrested scj 81
Next Stories
1 नाईट लाईफमुळे ‘निर्भया’सारख्या घटना वाढतील – राज पुरोहित
2 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा
3 अळूचं फदफदं हवं की मिरचीचा ठेचा? मनसे नेत्याने ट्विट करत दिले मोठ्या बदलाचे संकेत
Just Now!
X