पहिल्याच दिवशी १,६०० प्रवाशांकडून आरक्षण

मुंबई : करोनाकाळात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे तात्पुरती रद्द के लेली अहमदाबाद ते मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस १४ फे ब्रुवारीपासून पुन्हा सेवेत आली. अप-डाऊन मार्गावर पहिल्याच दिवशी या गाडीचे एकूण १६०० प्रवाशांनी आरक्षण केले होते.

टाळेबंदी शिथिल होताच १७ ऑक्टोबरपासून अहमदाबाद ते मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसही चालवण्यात आली. ही गाडी गुरुवार वगळता इतर सहा दिवस प्रवाशांच्या सेवेत होती. सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेऊनही तेव्हा तेजस एक्स्प्रेसची दररोज २५ ते ४० टक्केच तिकिटे आरक्षित होत होती. त्यामुळे २४ नोव्हेंबर २०२० पासून ही एक्स्प्रेस तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती.

करोनाचे संक्रमण कमी झाल्याने इंडियन रेल्वे केर्टंरग टुरिझम कॉर्पोरेशने (आयआरसीटीसी) १४ फे ब्रुवारीपासून तेजस एक्स्प्रेसची सेवा करोनाकाळातील सर्व नियम पाळून पुन्हा सुरू केली. गाडी क्रमांक ८२९०१ व ८२९०२ तेजस एक्स्प्रेस शुक्र वार, शनिवार, रविवार, सोमवार धावणार आहे.

या गाडीची प्रवासी क्षमता ७३६ आहे.  या गाडीला अहमदाबाद ते मुंबईदरम्यान नदियाड, वडोदरा, भरुच, सुरत, वापी, बोरिवली, अंधेरी स्थानकांत थांबा दिला आहे.