News Flash

मुंबई विमानतळावर मेगाब्लॉक; दोन धावपट्ट्या 6 तासांसाठी बंद

देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई छत्रपति शिवाजी विमानतळावरील मुख्य आणि द्वितिय धावपट्ट्या आज सहा तासांसाठी बंद

देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपति शिवाजी विमानतळावरील मुख्य आणि द्वितिय धावपट्ट्या आज सहा तासांसाठी बंद राहणार आहेत. दुरुस्तीच्या कामांसाठी या दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवण्यात येणार आहेत.


 
रद्द झालेली विमानं, किंवा वेळेत बदल केलेल्या विमानांबाबत प्रवाशांनी एअर इंडियाच्या संकेतस्थळावर, अॅपवर किंवा कॉल सेंटरला विचारणा करावी अशी माहिती एअर इंडियाने ट्विटरद्वारे दिली आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील मुख्य धावपट्टी आणि द्वितिय धावपट्टीवर आज दुरूस्तीचं काम करण्यात येणार आहे. दोन टप्प्यांमध्ये विमानतळावरील धावपट्टीचं काम केलं जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्याचे काम ऑक्टोबरमध्ये होत असून त्यानंतर ७ फेब्रुवारी ते ३० मार्चच्या दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील कामं केली जातील. यामध्ये 21 मार्च वगळता मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी ११ ते ५ या दरम्यान धावपट्टा बंद असणार आहेत. यामुळे दररोज उड्डाण घेणाऱ्या जवळपास ३०० विमानांवर याचा परिणाम होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 10:22 am

Web Title: mumbai airport runway to remain shut on 23rd october
Next Stories
1 नातीला भेटण्यासाठी आलेल्या आजीला दिवा स्थानकात रेल्वेची धडक, जागीच मृत्यू
2 शिर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या
3 …तोवर राजकीय गंगा स्वच्छ होणार नाही: शिवसेना
Just Now!
X