मुंबई विमानतळावरची मुख्य धावपट्टी आज बंद आहे. काल रात्री ११.४५ च्या सुमारास मुसळधार पावसामध्ये स्पाइस जेटचे विमान लँडिंग करताना धावपट्टीवरुन उतरले होते. बोईंग ७३७-८०० हे विमान अजूनही धावपट्टीवर अडकून पडले आहे. दुसऱ्या धावपट्टीवरुन लँडिंग आणि टेक ऑफ सुरु असले तरी त्याला विलंब लागत आहे.

स्पाइस जेटची घटना आणि मुसळधार पाऊस यामुळे जवळपास ५४ विमाने अहमदाबाद, गोवा आणि बंगळुरु या जवळच्या विमानतळाच्या दिशेने वळवली आहेत. ५२ विमाने रद्द करण्यात आली आहेत.

वातावरणाच्या स्थितीवर विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ अवलंबून आहे. विमानतळावर जाण्याआधी उड्डाणाबद्दल नेमकी माहिती जाणून घ्या. पाणी साचल्यामुळे विमानतळावर येण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो असे मुंबई पोलिसांनी सांगितले.