मुंबईसह ठाणे उपनगरात २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसाने हजारो नागरिकांना फटका बसला. यात ठाण्यातील ६ जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबियांची कधीही न भरून येणारी हानी झाली. तसेच, घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. याकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे यांनी गुरुवारी अतिवृष्टीग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. शिंदे यांची मागणी तात्काळ मान्य करत अतिवृष्टीत बाधित झालेल्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. अतिवृष्टीत झालेले नुकसान हे न भरून येणारे असले तरी या मदतीमुळे मुंबई आणि ठाणेकरांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असून तातडीने मदत जाहीर केल्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. मी स्वत: २९ आणि ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण परिसरामध्ये फिरून अतिवृष्टीचा मु देण्याचा प्रयत्न केला असून यथाशक्ती मदतही केली आहे. परंतु, झालेले नुकसान इतके मोठे आहे की, कितीही मदत केली तरी कमी पडेल, असे शिंदे यांनी यावेळी फडणवीस यांना सांगितले.

[jwplayer kyuuZRxc]