X
X

कोर्टात दाखवल्या तुरुंगातील चपात्या, मिळाली घरच्या जेवणाची परवानगी

READ IN APP

तुरूंगामध्ये कैद्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा किती खालावलेला असतो हे दाखवून देण्यासाठी मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील एका कैद्याने तुरुंगातील चपात्या थेट कोर्टात आणून दाखवल्या.

तुरूंगामध्ये कैद्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा किती खालावलेला असतो हे दाखवून देण्यासाठी मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील एका कैद्याने तुरुंगातील चपात्या थेट कोर्टात आणून दाखवल्या. न्यायाधीशांना चपात्या दाखवून त्याने, ‘घरगुती डॉक्टरांनी आजारपणामुळे मला प्रोटीनयुक्त पोषक आहार खाण्यास सांगितलं आहे, पण इतक्या खराब चापात्या खाऊन मला प्रोटीन कसे मिळणार ? याची गुणवत्ता कशी आहे, हे तुम्हीच पाहू शकता’ असं न्यायाधीशांना विचारलं. त्यानंतर चपात्या पाहून न्यायालयानेही चपात्यांचा दर्जा चांगला नसल्याचं सांगत आणि कैदी चाळीशीत असल्याचा विचार करून त्याला घरी बनवलेले जेवण मिळण्याची परवानगी दिली.

आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीने खाण्यायोग्य दर्जा या चपात्या नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आणि त्याला ६ महिन्यांपर्यंत घरी बनवलेले जेवण देण्याची परवानगी दिली. साजिद इलेक्ट्रिकवाला असे या कैद्याचे नाव आहे. एटीएसने २०१५ मध्ये त्याला अटक केली होती. एटीएसच्या कारवाईत त्याच्या फ्लॅटमध्ये १५१ किलो मेफेड्रोन हे ड्रग जप्त करण्यात होते. उत्तर मुंबईत ओशिवारा येथे सापडलेल्या या ड्रगची किंमत ३० कोटी रुपये होती.

20
X