News Flash

ठराव करेपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार

‘एनआरसी’विरोधी आंदोलक ठाम, सरकारचे आवाहन धुडकावले

‘एनआरसी’विरोधी आंदोलक ठाम, सरकारचे आवाहन धुडकावले

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व सूची आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी याविरोधात नागपाडय़ातील ‘मुंबई बाग’ येथे आंदोलन करणाऱ्या महिलांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार सुप्रिया सुळे यांची गुरुवारी भेट घेतली. एनपीआर आणि एनआरसीची अंमलबजावणी करणार नाही, असा ठराव विधानसभेत संमत करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिकाही या महिलांनी जाहीर केली आहे.

दरम्यान, नागरिकत्व कायदा दुरुस्ती (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर) विरोधात मुंबईत सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकारने मुस्लीम महिलांना गुरुवारी केले.  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयोजकांच्या शिष्टमंडळाशी मंत्रालयात चर्चा केली आणि आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. सध्या जेथे आंदोलन सुरू आहे, तेथे आंदोलनास पोलिसांची परवानगी नाही. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार कोणालाही आहे. मात्र पोलिसांची परवानगी असलेल्या ठिकाणीच आंदोलन व्हावे, असे देशमुख यांनी त्यांना सांगितले.

नागपाडय़ातील मोरलँड रस्त्यावर विनापरवानगी आंदोलन सुरू असल्याचे कारण देत पोलिसांकडून या महिलांना नोटीस पाठविल्या जात आहेत. त्यामुळे या नोटीस मागे घ्याव्यात, अशी मागणीही या महिलांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. शांततामय मार्गाने महिलांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्या आंदोलनातील महिलांना नोटीस पाठवून त्यांच्यावर दबाव आणणे योग्य नाही. पोलीस प्रशासनाने महिलांना सहकार्य करावे, अशी मागणी केल्याचे बिंजल शहा यांनी सांगितले. सरकारने एनपीआर लागू न करण्याचा ठराव विधानसभेत संमत करावा. त्यानंतर आंदोलन मागे घेण्याबाबत महिला विचार करतील, अशी भूमिकाही महिलांनी घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या महिलांचे गेल्या १९ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 4:22 am

Web Title: mumbai bagh women s met home minister anil deshmukh and supriya over cca nrc issue
Next Stories
1 दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी खटल्यास कधीपासून सुरुवात?
2 मुंबईत चार दिवस वाहतूक कोंडी?
3 भीमा-कोरेगाव ‘एनआयए’ तपासाला मुख्यमंत्र्यांची मान्यता