News Flash

धक्कादायक! वांद्रयात एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन केली आत्महत्या

वांद्रे पूर्वेला शासकीय वसाहतीतील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश भिंगारे यांनी पत्नी आणि दोन मुलांसह राहत्या घरी आत्महत्या केली.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

वांद्रे पूर्वेला शासकीय वसाहतीतील एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश भिंगारे (४५) यांनी पत्नी आणि दोन मुलांसह राहत्या घरी आत्महत्या केली. शासकीय वसाहतीतील इमारत क्रमांक दोनमध्ये ही घटना घडली.

गरीबी आणि नैराश्याला कंटाळून या संपूर्ण कुटुंबाने आपले जीवन संपवले. आज सकाळपासून त्यांच्या घरातून कोणीही बाहेर पडले नाही म्हणून शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना घरातील चारही सदस्य मृतावस्थेत आढळले.

शेजाऱ्यांनी लगेच खेरवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये मागच्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहोत असे लिहिले होते.

राजेश भिंगारे चर्चगेट येथील रेशनिंग ऑफिसमध्ये शिपायाची नोकरी करत होते. त्यांची पत्नी अश्विनी गृहिणी होती. त्यांचा मुलगा तृषार (२३) नोकरीला होता आणि दुसरा मुलगा गौरांग (१९) कॉलेजमध्ये शिकत होता. राजेश आणि त्यांच्या पत्नीने जेवणात विष मिसळून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

सध्याच्या घडीला ही आत्महत्या वाटत आहे. भिंगारे यांनी चिठ्ठीमध्ये आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे असे खेरवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 4:25 pm

Web Title: mumbai bandra govt colony family suicide
टॅग : Bandra
Next Stories
1 पुण्यात आठ हजार किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल जप्त, तीन लाख ६९ हजाराचा दंड वसूल
2 धक्कादायक! पुण्यात आळंदीमध्ये ११ महिन्याच्या मुलाने गिळला रिमोटचा सेल
3 नाशिकमध्ये  बस आणि क्रुझरचा अपघात, ५ ठार; ६ गंभीर जखमी
Just Now!
X