News Flash

मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार

काही वर्षांपूर्वीच ती मुंबईत आली होती.

संग्रहित छायाचित्र

वांद्रे परिसरात घरकाम करणाऱ्या पंचवीस वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सलीम झवेरी (६०) याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिला ही मूळची उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. नवऱ्याबरोबर भांडण झाल्याने काही दिवसांपूर्वी ती मुंबईला आली होती. मुंबईत तिच्या परिचयाचे कोणीच नव्हते. ती घराच्या शोधात असतानाच तिची झवेरी याच्याशी ओळख झाली. झवेरी याची पत्नी काही दिवसांपूर्वी परदेशी गेली असून झवेरी याने तिला निवारा आणि घरकाम देण्याचे आमिष दाखवून घरी नेले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मागील काही दिवसांपासून पीडित महिला ही त्याच्या घरीच वास्तव्याला होती. या कालावधीत झवेरीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच २८ डिसेंबरला पीडित महिलेवर त्याने विकृतपणे अत्याचार केले. त्यामुळे जखमी झालेल्या तिला उपचारांसाठी वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी झवेरी याला सोमवारी सायंकाळी अटक केली असून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 10:13 am

Web Title: mumbai bandra lady rape one arrested jud 87
Next Stories
1 एमटीएनएल वाहिनीच्या खड्डय़ात पडून दोन कामगारांचा मृत्यू
2 खातेवाटपाचा पेच सुटेना!
3 करबुडव्यांच्या मालमत्तांचा लिलाव
Just Now!
X