News Flash

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, मुंबईतील विकृत दाम्पत्याला अटक

पतीचे वय ५४ वर्ष असून त्याची पत्नी ४० वर्षांची आहे. नराधम पती पत्नीसमोरच त्या मुलीवर अत्याचार करायचा. तीन दिवस त्यांनी पीडित मुलीला घरातच डांबून ठेवले.

संग्रहित छायाचित्र

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुंबईतील विकृत व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या आईला देखील अटक केली असून पैशापोटी तिने स्वत:च्याच मुलीला या दाम्पत्याच्या घरी पाठवले होते.

जुहू येथे राहणारी १४ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झाली होती. मुलीच्या आईने ही तक्रार दाखल केली होती. चार दिवसांनी ती मुलगी घरी परतली होती. घरी परतल्यावर तिने आईला घडलेला प्रकार सांगितला आणि हा प्रकार ऐकून तिच्या आईला धक्काच बसला.

१४ वर्षांच्या मुलीला तिच्याच परिसरात महिलेने घरकाम देण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याकडे नेले. २१ जुलै रोजी ते दाम्पत्य पीडित मुलीला घेऊन मिरारोड येथील वन रुम किचनमध्ये गेले. तिथे तीन दिवस त्या मुलीवर अत्याचार करण्यात आले. यातील पतीचे वय ५४ वर्ष असून त्याची पत्नी ४० वर्षांची आहे. नराधम पती पत्नीसमोरच त्या मुलीवर अत्याचार करायचा. तीन दिवस त्यांनी पीडित मुलीला घरातच डांबून ठेवले.

दुसरीकडे पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ही माहिती त्या दाम्पत्याला समजली होती. त्यांनी घाबरुन मुलीला सोडून दिले. अत्याचारांमुळे घाबरलेली मुलगी घरी गेली नाही. ती रात्रभर परिसरातील बागेत बसून होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती काही वेळ स्टेशन परिसरात थांबली. वेदना असह्य झाल्याने ती घरी परतली.

२५ जुलैला तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठून दाम्पत्याविरोधात तक्रार दिली. सुरुवातीला पीडित मुलगी पोलिसांना घडलेला प्रकार सांगण्यास घाबरत होती. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेत तिला बोलते केले. तिच्या १६ वर्षांच्या मैत्रिणीवरही या दाम्पत्याने अत्याचार केले होते, याच मैत्रिणीच्या आईने मला दाम्पत्याच्या घरी नेले, अशी माहिती तिने पोलिसांना दिली.

पोलिसांनी तिच्या १६ वर्षांच्या मैत्रिणीलाही पोलीस ठाण्यात बोलावले आणि तिलाही बोलते केले. तिने देखील अत्याचार झाल्याचे सांगितले. मात्र, आईनेच मला तिथे पाठवले होते आणि त्या दाम्पत्याने मला धमकी दिल्याने मी हतबल होते, दोन महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरु आहे, असे १६ वर्षांच्या मुलीने पोलिसांना सांगितले. या मुलीची आई घरकाम करते. ती विधवा आहे. दाम्पत्याकडून तिला एका मुलीसाठी अडीच हजार रुपये मिळायचे. पैशाच्या हव्यासापोटी तिने स्वत:च्याच मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला या विकृत दाम्पत्याकडे पाठवले. पोलिसांनी त्या दाम्पत्याला आणि पीडित मुलीच्या आईला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 7:19 am

Web Title: mumbai based couple arrested sexually assaulting two minor girls
Next Stories
1 मुंबई एटीएसची नालासोपाऱ्यात कारवाई: एकजण ताब्यात
2 चेंबूरकरांवरील संकट गडद
3 चर्चगेट पादचारी मार्गाच्या निकृष्ट कामाबाबत पालिका विभाग कार्यालयाचे दक्षता विभागाला पत्र
Just Now!
X