News Flash

सोंगाड्याने बुलेट ट्रेनची काळजी करू नये, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

नव्या कल्पनांचे 'खड्डे' ज्यांच्याकडे त्यांनी बुलेट ट्रेनची काळजी करू नये

बुलेट ट्रेनप्रश्नी भाजपला धारेवर धरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

बुलेट ट्रेनप्रश्नी भाजपला धारेवर धरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ज्यांनी मराठा मूक मोर्चाचा अपमान केला ते सोंगाडे मंत्रिमंडळ उपसमितीबद्दल आम्हाला विचारतात घोंगड्याखाली काय? परंतु, निवडणुकीत त्यांचे झालेले हाल त्यांनी विसरू नये, असा उपरोधिक टोला लगावत बुलेट ट्रेनची काळजी करू नका, असा सल्लाही दिला. एकामागोमाग एक असे सलग तीन ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या ‘सामना’ या वृत्तपत्रातून उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या अग्रलेखाचा समाचार घेतला. शेलार यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे-शेलार वाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे आहेत.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत बुलेट ट्रेनची पायाभरणी केली. तेव्हापासून शिवसेनेने ‘सामना’तून भाजपवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. मराठा आरक्षणाचा दाखला देत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यामागे सरकारचा हेतू काय असा सवाल ठाकरे यांनी उपस्थितीत केला होता.

यावर शेलार यांनी म्हटले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि कायद्याच्या चौकटीत टिकावे म्हणून भाजप सरकारचे काम सुरू असून मंत्रिमंडळ उपसमिती हा त्याचेच एक पाऊल आहे. पण ज्यांनी मराठा मूक मोर्चाचा अपमान केला, ते सोंगाडे आम्हाला विचारतात, घोंगड्याखाली काय? आठवा निवडणुकीत किती ठिकाणी तुमचे झाले खाली डोके वरती पाय, असा टोला लगावला.

जे मुंबईत, रस्ते, नाल्यांच्या कामाचा दर्जा सांभाळू शकत नाहीत. नव्या कल्पनांचे ‘खड्डे’ ज्यांच्याकडे त्यांनी उगाच बुलेट ट्रेनची काळजी करू नये, असा सल्ला त्यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमधून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 10:21 pm

Web Title: mumbai bjp president ashish shelar slams on shiv sena party chief uddhav thackeray on maratha reservation bullet train
Next Stories
1 चेंबूरमधील आर. के. स्टुडिओत भीषण आग
2 भुयारी गटारद्वार उघडण्यामागे स्थानिक कार्यकर्ते
3 ‘म्हाडा’ची घरे न परवडणारी
Just Now!
X