सर्वाधिक प्रमाण कुर्ला परिसरात

मुंबई : महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून गेल्या सहा महिन्यांत २४ लाख ८९ हजार १०० रुपये एवढा दंड वसूल के ला आहे. एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ४६१ अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – २००६’ तयार करण्यात आले आहेत. याच उपविधीनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. या अंतर्गत सर्वाधिक दंड वसुली कुर्ला परिसरातील ‘एल’ विभागातून करण्यात आली आहे. तर सर्वात कमी दंड वसुली मुलुंडमध्ये झाली आहे. अनेक विभागांत तर सहा महिन्यांत के वळ २० ते ८० हजार रुपयेच दंड वसूल करण्यात आला.

सर्वाधिक दंड वसुली  ३,५२,६००

कु र्ला ‘एल’ विभाग  ३,२९ ,८००

कु लाबा,चर्चगेट ‘ए’ विभाग  २,३४ ,८००

गिरगाव, मुंबादेवी ‘सी’ विभाग

सर्वात कमी दंड वसुली           ११,६००

मुलुंड ‘टी’ विभाग 

देवनार, मानखुर्द ‘एम पूर्व’ विभाग  १९,२००

भायखळा                                        २०,०००

‘ई’ विभाग

२६,००० वरळी, प्रभादेवी ‘जी दक्षिण’ विभाग

२५,९०० दादर, माहीम ‘जी उत्तर’ विभाग