News Flash

नोकरीची संधी: मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची हंगामी भरती; ३० हजार रुपये ठोक मानधन

२४ जुलै अर्ज करण्याची अखेरची तारीख...

मुंबईमध्ये दिवसेंदिवस करोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. अशात आता, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात करोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कोव्हिड उपचार केंद्रे तसेच विविध रुग्णालये येथे पॅरामेडिकल संवर्गातील कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात 3 महिन्यांच्या कालावधीसाठी ठोक मानधन तत्त्वावर भरती होत आहे. एकूण 203 विविध पदांसाठी ही भरती होत असून यासाठी 24 जुलैपर्यंत अर्ज करता येतील. जाणून घेऊया याबाबतची सर्व माहिती –

एकूण रिक्त पदे 203 :-
(1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 51 पदे. पात्रता – बी.एस्सी. + डीएम्एल्टी उत्तीर्ण किंवा 12 वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिनमधील पदवी उत्तीर्ण.
(2) क्ष-किरण तंत्रज्ञ – 52 पदे. पात्रता – 12 वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमधील पदवी उत्तीर्ण किंवा बी.एस्सी. + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि 1 वर्षाचा अनुभव किंवा 12 वी (विज्ञान/टउश्उ) + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि 2 वर्षांचा अनुभव.
(3) ई.सी.जी. तंत्रज्ञ – 39 पदे. पात्रता – 12 वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी टेक्नॉलॉजीमधील 3 1/2 वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण.
(4) औषध निर्माता – 61 पदे. पात्रता – डी.फार्म./बी.फार्म. (उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी काऊन्सिलकडे नोंदणीकृत असावा.)

वयोमर्यादा – दि. 1 जुलै 2020 रोजी 18 ते 50 वर्षे.

वेतन – सर्व पदांकरिता ठोक मानधन रु. 30,000/- प्रतीमाह.

निवड पद्धती – उमेदवारांनी अंतिम वर्षाच्या पदवी/पदविका परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार निवड केली जाईल. (पदविका/पदवी परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण गुणांमधून प्रत्येक प्रयत्नासाठी 10 गुण वजा केले जातील.)

अर्जाचा विहीत नमुना –  https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीसोबत उपलब्ध आहे.

अर्ज व्यक्तिश: सादर करण्याचे ठिकाण : ‘प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, सातवा मजला, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर्.के. पारकर मार्ग, बांद्रा (प.), मुंबई – 400 050’.

उमेदवारांनी आपले अर्ज व्यक्तिशः अथवा ई-मेलद्वारे कागदपत्रांच्या/गुणपत्रिकांच्या/प्रमाणपत्रांच्या स्कॅन कॉपीसह दि. 24 जुलै 2020  संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत ao03cms.ph@mcgm.gov.in या ई-मेल आयडीवर अपलोड करावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 11:44 am

Web Title: mumbai bmc coronavirus warriors seasonal recruitment 203 vacancies get all details sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उद्धव ठाकरे भूमिपूजनासाठी अयोध्येत जाणार का? संजय राऊत यांनी केलं स्पष्ट
2 टाळेबंदीमुळे ताळेबंद डळमळीत
3 वरळी कोळीवाडा करोनामुक्तीकडे
Just Now!
X