News Flash

शिवाजी पार्कमधील ‘सेल्फीश’ राजकारणाला लगाम; पालिकेकडून सेल्फी पॉईंटसची परवानगी रद्द

शिवसेना, भाजप आणि मनसे या तिन्ही पक्षांना शिवाजी पार्कमध्ये स्वतंत्रपणे सेल्फी पॉईंटस उभारण्यासाठी दिलेली परवानगी

selfie points in Shivaji park : मागील आठवड्यात गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेचा बालेकिल्ला ठरलेल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील सेल्फी पॉईंट आता बंद करण्यात आला होता.

दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील राजकीय पक्षांच्या ‘सेल्फीश’ राजकारणाला महानगरपालिकेच्या निर्णयाने लगाम बसला आहे. महानगरपालिकेने काल शिवसेना, भाजप आणि मनसे या तिन्ही पक्षांना शिवाजी पार्कमध्ये स्वतंत्रपणे सेल्फी पॉईंटस उभारण्यासाठी दिलेली परवानगी रद्द केली आहे. काल पालिकेने सेल्फी पॉईंट उभारण्याला परवानगी दिल्यामुळे आज येथील स्थानिक रहिवाशांच्या संघटनेने वॉर्ड कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या रहिवाशांनी याठिकाणी सेल्फी पॉईंटस उभारण्यास विरोध केला. त्यामुळे पालिकेला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि राजकीय पक्षांच्या सेल्फी पॉईंटसची परवानगी रद्द करण्यात आली.

मागील आठवड्यात निवडणुकीतील पराभवाचा ‘बदला’ म्हणून निकाल होताच शिवाजी पार्क येथील ‘सेल्फी पॉइंट’ हटवून टाकणाऱ्या मनसेला आणि या भागातील निवडणूक जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या शिवसेनेला पिछाडीवर टाकत भाजपने या ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारण्याची परवानगी मिळवली होती. त्यामुळे चवताळून उठलेल्या सेना, मनसेनेही पालिकेकडे आग्रह धरल्याने अखेर ५० फूट अंतरावर तिन्ही पक्षांना आपापले सेल्फी पॉइंट उभारण्याची परवानगी पालिका अधिकाऱ्यांनी दिली होती. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या कल्पक बुद्धीतून शिवाजी पार्क येथे उभा राहिलेला शहरातील पहिला सेल्फी पॉइंट तरुणांमध्ये प्रसिद्ध झाला. मात्र पत्नी स्वप्ना यांचा शिवाजी पार्क प्रभागात पराभव झाल्याचे जिव्हारी लागल्यावर संदीप देशपांडे यांनी रागाने हा सेल्फी पॉइंट काढून टाकला. या सेल्फी पॉइंटच्या देखभालीचा खर्च परवडणार नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले. राजकारणात सर्वसामान्य जनतेवर राग काढण्याची किंमत किती असते याचा मनसेला लगेच अनुभव आला. सेल्फी पॉइंट बंद झाल्याची बातमी वेगाने पसरली. भाजपने विद्युतवेगाने हालचाली करून गुरुवारी सकाळी वॉर्ड अधिकाऱ्यांकडून सेल्फीसाठी अधिकृत जागा मिळवली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी ट्वीटवरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली. तब्बल पाच वर्षांच्या वनवासानंतर दादरचा किल्ला पुन्हा ताब्यात घेणाऱ्या सेनेनेही लगबग करून स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांचे छायाचित्र असलेला फलक लावून सेल्फी पॉइंट उभारणार असल्याचे जाहीर केले. झालेली चूक निस्तरण्यासाठी मनसेनेही सेल्फी पॉइंट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र बाणातून सुटलेल्या तीराची किंमत मनसेला मोजावी लागली.

पालिका अधिकाऱ्यांकडून गुरुवारी अवघ्या दोन तासांत भाजपला सेल्फी पॉइंटची परवानगी दिली गेल्यावर सेना व मनसेकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. पक्षपातीपणाचा आरोप होऊ नये यासाठी जी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याकडे शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आली व तिथे सर्वच पक्षांना ५० फूट अंतरावर सेल्फी पॉइंट उभारण्याची परवानगी दिली गेली.

मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क भागात नगरसेवक असताना सेल्फी पॉईंट सुरु करण्यात आला होता. मुंबईतील पहिलाच अशाप्रकारचा सेल्फी पॉईंट असल्याने तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, यावेळी संदीप देशपांडेच्या पत्नी स्वप्ना देशपांडे या शिवाजी पार्कातून नगरसेवकपदासाठी उभ्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी त्यांचा पराभव केला. त्यांनंतर अगदी काही दिवसातच संदीप देशपांडे यांनी देखभालीसाठी सीएसआर निधी उपलब्ध होत नसल्याचं कारण देत सेल्फी पॉईंट बंद केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 4:12 pm

Web Title: mumbai bmc deinde permission to selfie points of shivsena mns bjp in shivaji park dadar mumbai
Next Stories
1 मॉडेलच्या थट्टामस्करीमुळे मुंबई विमानतळावर सुरक्षा यंत्रणांना मनस्ताप
2 बारावीचे पेपरफुटीचे सलग तिसरे वर्ष
3 मुंबई पोलीस दलात आता दैनंदिन टपालाला टाटा!
Just Now!
X