मुंबईतील काळबादेवी येथे लागलेल्या आगीत दोन अग्मिशमन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर शनिवारी पालिका आयुक्तांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीत सात सदस्यांचा समावेश आहे. ही समिती आग विझवताना अग्निशमन दलाला सामना कराव्या लागलेल्या अडचणींच्या कारणांचा शोध घेणार आहे. अग्निशमन दलाला यावेळी उपकरणांची वानवा जाणवली का किंवा पुरेशा सोयीसुविधा असत्या तर हे अधिकारी बचावले असते का, या सगळ्याची चौकशी करणार आहे. येत्या दोन आठवड्यांत ही समिती पालिकेसमोर अहवाल सादर करणार आहे.