06 April 2020

News Flash

मरीन ड्राईव्हवरील सचिन तेंडुलकरची शिल्पाकृती हटविण्याचे पालिकेचे आदेश

याठिकाणी पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करण्यास बंदी आहे.

Sachin Tendulkar : सप्टेंबर २०१५ मध्ये नरिमन पॉईंट आणि चर्चगेट रहिवाशी संघाने सचिनच्या शिल्पाकृतीबाबत पालिकेकडे तक्रार केली होती.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात उभारण्यात आलेले शिल्प ( मेटल आर्ट) हटविण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत. येत्या २४ तासांमध्ये हे शिल्प हटविण्यात यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी कारवाई करण्यात येईल, असे पालिकेने शिल्पाची उभारणी करणाऱ्या आरपीजी फाऊंडेशनला पाठविलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे.
यापूर्वीही आरपीजी फाऊंडेशनला मुंबई हेरिटेज संवर्धन समितीने नोटीस बजावली होती. मात्र त्याचे पालन न झाल्यामुळे पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह हा परिसर ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला असून या परिसराचा युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थानांमध्येदेखील समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करण्यास बंदी आहे. त्यामुळेच सप्टेंबर २०१५ मध्ये नरिमन पॉईंट आणि चर्चगेट रहिवाशी संघाने या शिल्पाकृतीबाबत पालिकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आरपीजी फाऊंडेशननेही ही शिल्पकृती अन्यत्र हलवण्याची तयारी दाखवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 2:57 pm

Web Title: mumbai bmc ordered to remove sachin tendulkar metal art in marine drive
Next Stories
1 राज ठाकरेंच्या वाढदिवशी ओवेसींचे चित्र असलेल्या केकचे कटिंग
2 विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्यास मंत्रिमंडळाची तत्त्वतः मंजुरी
3 आघाडी सरकारचा हजारो कोटींचा ऑनलाइन लॉटरी घोटाळा
Just Now!
X