पालिके कडून मात्र खारफुटींच्या ऱ्हासाला हातभार

मुंबई : पाणी शोषून घेण्याच्या क्षमतेमुळे पूरस्थितीपासून मुंबईचे संरक्षण करू शकणारी खारफुटी वाचवण्यासाठी दरवर्षी जवळपास १५ लाख रुपये खर्च करत असताना मुंबई महानगरपालिका मात्र हे पैसे पाण्यात घालवत असल्याचे दिसत आहे. पालिकेच्या गाडय़ांमधून आणलेले सिमेंटचे घातक पाणी खारफुटींमध्ये सोडले जात असल्याचे गेल्या काही दिवसांत आढळले आहे.

भांडुप येथे २० मे रोजी पालिके च्या मलनिस्सारण वाहनातून सिमेंट-काँक्रीटचे पाणी खारफुटीमध्ये सोडले जात होते. तसेच २ जूनला वडाळा बस आगाराजवळदेखील असाच प्रकार घडला. बांधकामाच्या ठिकाणावरून आणलेले सिमेंट-काँक्रीटचे मिश्रण खारफुटींमध्ये सोडण्यात आले. त्याची छायाचित्रे आणि चित्रफिती वनशक्ती संस्थेने ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी डॉ. हर्षवर्धन कांबळे यांना पाठवली; मात्र अद्याप त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. वनशक्तीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मंडळाचे सध्याचे प्रादेशिक अधिकारी सतीश पडवळ यांच्याकडे विचारणा के ली असता, ‘संबंधित घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.

पर्यावरणाचा तोल ढासळत चालल्याने समुद्राच्या जलपातळीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे विविध अभ्यासांमधून समोर आले आहे. अशावेळी पाणी शोषून घेणारी खारफुटी वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात असताना पालिका मात्र खारफु टींबाबत हलगर्जीपणा करताना दिसत आहे.

कोटय़वधी रुपये पाण्यात..

राज्यभरातील खारफु टींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभागाने २०१२ साली ‘कांदळवन कक्ष’ स्थापन के ला. त्याअंतर्गत ‘महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान’ (कांदळवन प्रतिष्ठान) काम करते. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील खारफु टींच्या संवर्धनासाठी १५ कोटी रुपये खर्च के ले जात असल्याची माहिती उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांनी दिली. खारफु टींची लागवड आणि तेथे रोजगारनिर्मितीही के ली जाते. ‘कांदळवन कक्षाच्या अंतर्गत २०१३ साली ‘मुंबई कांदळवन संधारण घटक’ ही संस्था स्थापन झाली. याअंतर्गत ५ वनपरिक्षेत्र अधिकारी, ३३ कर्मचारी, महाराष्ट्र संरक्षण दलाचे १३७ कर्मचारी काम करतात. खारफु टींमध्ये भराव किं वा राडारोडा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे, खारफु टींची लागवड, इत्यादी कामे ही संस्था करते, अशी माहिती ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. जी. कोकरे यांनी दिली. पालिके च्या दुष्कृत्यामुळे कांदळवन कक्षाची मेहनत आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.

जैवसंपदेवर दुष्परिणाम

गोल्डन जॅकॉल कोल्हा, उंदीर, साप, खेकडे, मुंगूस, फ्लेमिंगो, इत्यादी प्राणी-पक्षी खारफु टींमध्ये वास्तव्य करतात. या भागात मासे अंडी घालतात. खारफु टींमध्ये मोठय़ा माशांना येता येत नसल्याने अंडय़ांना संरक्षण मिळते. सिमेंटचे पाणी खारफु टींमध्ये ओतल्यास तेथे सिमेंट साचून राहाते व झाडांच्या श्वसनप्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. अनैसर्गिक रसायन पचवण्याची ताकद खारफु टींमध्ये नसल्याने त्या मृत पावतील आणि तेथील जैवविविधता नष्ट होईल. खेकडे, मासे न मिळाल्याने याचा परिणाम मच्छीमारांच्या उपजीविकेवरही होईल, अशी माहिती खारफु टी संवर्धनासाठी काम करणाऱ्या नंदकु मार पवार यांनी दिली.