महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या करोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी लस संपल्याचे फलक झळकले. लसींचे डोस संपल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागलं. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसीमधील लसीकरण केंद्रातील लसींचा पुरवठा संपल्याचे बोर्ड केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. त्यामुळेच या लसीकरण केंद्राबाहेर व्हॅक्सिन आऊट ऑफ स्टॉक म्हणजेच लसी संपल्या आहेत असा बोर्ड झळकलाय. "राज ठाकरे म्हणजे, करोना काळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव 'राजा' माणूस" केंद्र सरकारच्या त्या निर्णयानंतर #मराठी दिग्दर्शकाकडून राज ठाकरेंचं कौतुक#RajThackeray @RajThackeray @mekedarshinde @mnsadhikrut #coronavirus — LoksattaLive (@LoksattaLive) April 20, 2021 या लसीकरण केंद्राचे प्रमुख असणाऱ्या राजेश डेरे यांनी यासंदर्भात एएनआयला माहिती दिली. कोविशील्डचे ३५० ते ४०० डोस केंद्रात होते. हे डोस मंगळवार सकाळपासून येथे नोंदणी करुन येणाऱ्या नागरिकांना देण्यात आलेत. मात्र त्यानंतर येथे लसींचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे आता पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागणार असल्याचं डेरेंनी स्पष्ट केलं आहे. दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सीनचे दोन हजार डोस उपलब्ध असून ते आज दिवसभरात दिले जाणार असल्याचंही डेरे म्हणाले. "संध्याकाळपर्यंत आम्हाला कोव्हिशील्डचे डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं आहे. असं झाल्यास पुन्हा लसीकरण सुरु केलं जाईल. कोविशील्डच्या लसी संपल्यासंदर्भात आम्हाला काल रात्री उशीरा माहिती मिळाली," असंही डेरे म्हणालेत. Mumbai: Boards reading 'Vaccine out of stock', put up outside BKC vaccination centre. Dean of the Centre says, "We had 350-400 Covishield doses, we've administered it. We're awaiting more doses. Around 2000 Covaxin doses are available for second dose, that is being administered." pic.twitter.com/b9pmrzCqeU — ANI (@ANI) April 20, 2021 लस टंचाईचा सलग तिसरा दिवस. मुंबईतील लस टंचाईचा मंगळवार हा सलग तिसरा दिवस ठरला आहे. सोमवारीच मुंबईत ३१ खासगी लसीकरण केंद्र लससाठ्या अभावी बंद ठेवण्यात आली. दिवसभरात लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्रही दिसून आलं. सोमवारी केवळ ३५ हजार ३०९ लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी १० हजार लोकांनी लशीचा दुसरा डोस घेतला. Photos : गुजरातमध्ये मशिदीतच उभारलं ५० बेड्सचं कोव्हिड सेंटर 'रमजानच्या महिन्यात यापेक्षा अधिक दुसरं कोणतं पवित्र काम करता येईल," अशा शब्दांमध्ये ट्रस्टींनी आपल्या भावाना व्यक्त केल्या.#CoronaVirusUpdates #COVID19 #vadodara #mosque #Ramazan — LoksattaLive (@LoksattaLive) April 20, 2021 लसींचा तुटवडा ठरतोय अडथळा. केंद्र सरकारने एकीकडे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबईत अद्याप पहिल्या दोन टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले नाही. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे व ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण वेगाने झालेले नाही. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिके ने मुंबईतील केंद्र वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र लससाठ्याअभावी हा वेग अद्याप कमीच आहे. मुंबईत सध्या लसीकरणासाठी १२९ केंद्र आहेत. त्यापैकी पालिके ची ३९, राज्य व केंद्र सरकारची १७ आणि खासगी रुग्णालयातील ७३ केंद्र आहेत. मात्र यापैकी ३१ केंद्र सलग दोन दिवस बंद ठेवावी लागली आहेत. मध्य प्रदेश : ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने भोपाळमध्ये १० करोना रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत मध्य प्रदेशमधील भोपाळ, सागर, जबलपुर आणि उज्जैनमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकार समोर आलेत#coronavirus #MadhyaPradesh #Covid19 #Oxygen — LoksattaLive (@LoksattaLive) April 20, 2021 मुंबईतील लसीकरणाची स्थिती काय? मुंबईत गेल्या आठवड्यापर्यंत ४० ते ५० हजार लोकांचे लसीकरण एका दिवसात होत होते. मात्र सोमवारी ३५,३०९ लोकांचेच लसीकरण होऊ शकले. खासगी केंद्रांवर जेमतेम ५८५८ लोकांचे लसीकरण होऊ शकले मुंबईत आतापर्यंत २० लाखाहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख ६१ हजार नागरिाकांच्या दोन्ही मात्रा घेऊन झाल्या आहेत.