11 December 2017

News Flash

मुंबई: मालगाडीवर सेल्फी घेताना मुलाचा मृत्यू

अनिकेत थोरात हा मुंबईतील अंबरनाथ येथे वास्तव्यास होता.

मुंबई | Updated: August 13, 2017 3:17 PM

संग्रहित छायाचित्र

मालगाडीवर सेल्फी घेताना ओव्हरहेडच्या वायरचा शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. अनिकेत थोरात (१७) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना मुंबईत घडली.

अनिकेत थोरात हा मुंबईतील अंबरनाथ येथे वास्तव्यास होता. शुक्रवारी दुपारी तो रेल्वे यार्ड परिसरात फिरण्यासाठी आला होता. या वेळी उभ्या असलेल्या एका मालगाडीवर चढून त्याने मोबाइलने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हात ओव्हरहेडच्या वायरला लागला. यात जोराचा शॉक लागून तो खाली कोसळला.

हा प्रकार लक्षात येताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्याच आठवड्यात पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावरून सेल्फी घेताना आठ महिन्यांची गर्भवती खाली कोसळली होती. सुदैवाने यातून ती थोडक्यात बचावली होती. तसेच सिंधुदुर्गातही दोघांचा सेल्फीने जीव घेतला होता.

First Published on August 13, 2017 3:13 pm

Web Title: mumbai boy attempt to click selfie on goods rail dies due to overhead shock